आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्यसंस्कार:मुंबई येथे व्याह्याच्या अंत्यसंस्कारासाठी गेले अन् रात्री झाली घरफोडी

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कल्याण (मुंबई) येथे व्याह्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच लगेच रात्रीच रवाना झालेल्या एका व्यक्तीच्या घरी त्याच रात्री चोरट्यांनी हातसफाई केली. शनिवारी ही घटना उघड झाली.

सुधाकर कुरकुरे (रा. विवेकानंदनगर) यांच्या घरी ही चोरी झाली आहे. कुरकुरे यांचे कल्याण येथे राहणाऱ्या व्याही शुक्रवारी रात्री वारले. यामुळे रात्री ११.४५ वाजता कुरकुरे कुटुंब तातडीने मुंबईला निघाले. याच रात्री चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातून ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व २० हजार रुपये रोख असा ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

बातम्या आणखी आहेत...