आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयाची विद्यार्थ्याकडून युट्यूब चॅनलवर बदनामी:प्राध्यापक, कर्मचाऱ्यांबाबत वापरली अश्लिल भाषा; सायबर ठाण्यात गुन्हा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शिरसोली रोडवरील एका नामांकित महाविद्यालयाच्या बाबतीत एका व्यक्तीने युट्यूब चॅनलवर अश्लिल भाषेचा वापर करून बदनामी केली. या प्रकरणी मंगळवारी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात नामांकित संस्था असून त्या संस्थेच्या माध्यमातून महाविद्यालय चालवले जात आहे. या महाविद्यालयाचे युट्यूवर चॅनल देखील आहेत. यावर महाविद्यालयातील शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे व्हिडीओ अपलोड केले जातात. 8 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान महाविद्यालयाच्या युट्यूब चॅनलवर एका कार्यक्रमांसदर्भात व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहे.

मोबाईलवर पाठवले अश्लिल मेसेज

दरम्यान, अपलोड केलेल्या व्हिडीओला सदाफ शेख (पुर्ण नाव माहित नाही) नावाच्या व्यक्तीने अश्लिल भाषेचा वापर करून संस्थेसह प्राध्यापक आणि कर्मचारी यांची बदनामी केले आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील महिला प्राध्यापक व इतरांच्या मोबाईलवर अश्लिल मॅसेज पठवल्याचा प्रकार समोर आला आहे. याबबात महाविद्यालयाचे प्राचार्यांनी मंगळवारी रोजी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्‍यांच्या तक्रारीवरून सदाम शेख या नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे तपास करत आहेत.

वाईट प्रचार झाल्याने उडाली खळबळ

दरम्यान, महाविद्यालय व संस्थेच्या बाबतीत या पूर्वी देखील असे प्रकार समोर आले आहेत. काही प्रकरणात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यातच आता महिला प्राध्यापक बाबत सोशल मीडियावर आशा प्रकारे बदनामी झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...