आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • A Clip Of That Conversation Presented By Khadsen; Abusive Words To Tehsildars, Offensive Conversation About Women Are Mentioned| Marathi News

पोलिस आणि परिवहन विभागासंदर्भात प्रश्न उपस्थित:त्या संवादाची क्लिप खडसेंकडून सादर; तहसीलदारांना अपशब्द,महिलांविषयी आक्षेपार्ह संवादाचा आहे उल्लेख

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात आमदार एकनाथ खडसे यांनी तहसीलदारांना शिव्या देणारे, महिलांविषयी आक्षेपार्ह संवाद असलेली गुंडांची क्लिप मंगळवारी सादर केली. त्यांची कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावरील हल्लाप्रकरणी दाखल तक्रारींचा पोलिसांनी तपास केला नाही. त्यांच्यावर वरिष्ठ पातळीवरून दबाव टाकण्यात आला. वाळूमाफिया, गुन्हे दाखल असलेले, तडीपारीच्या नोटीस देण्यात आल्या होत्या, अशा गुंडांचे मुख्यमंत्री समर्थन करत असल्यास पोलिस काय तपास करणार असा आरोपही केला.

पुरवणी मागण्यांसंदर्भात खडसे यांनी पोलिस आणि परिवहन विभागासंदर्भात प्रश्न उपस्थित केले. २८ डिसेंबर रोजी कोथळी-मानेगाव येथे रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्या तक्रारीत सुनील पाटील, छोटू भोई, पंकज कोळी व इतर चार जणांची नावे होती. गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याची चौकशी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एका आयपीएस अधिकाऱ्यांकडे दिली. नाशिक पोलिस आयुक्तांनी या तक्रारीची पूर्णपणे चौकशी केली नाही. ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल असताना त्यांना मोकळीक देण्यात आली. शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना एकनाथ खडसे यांच्या धाकामुळे बाहेर फिरता येत नसल्याचे मत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले होते. गुन्हे दाखल असलेल्यांचे मुख्यमंत्री समर्थन करीत होते. मुख्यमंत्रीच त्यांचे समर्थन करतील तर दाद मागायची कुणाकडे? जिल्हा बँकेच्या अध्यक्षांवर जीवघेणा हल्ला होतो. या प्रकरणात सत्य समोर आले पाहिजे, अशी मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...