आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:आजीचा कट्टा उपक्रमात रंगली गोष्ट

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विवेकानंद पूर्व प्राथमिक विभागात ‘आजीचा कट्टा’ उपक्रमांतर्गत सरोज वाडकर यांनी मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत गणपतीची गोष्ट सांगितली. आजीचा परिचय नंदा पाटील यांनी करून दिला.

आजीच्या कट्टा अंतर्गत आजींनी मुलांना गणपतीची प्रदक्षिणा ही गोष्ट सांगितली. या गोष्टीत त्यांनी मुलांशी उत्तम संवाद साधला. गोष्टीबरोबरच गणपतीच्या आईचे, वडिलांचे, भावाचे नाव, गणपतीचे वाहन, कार्तिकेयचे वाहन, गणपतीला आवडणारा प्रसाद, फूल याबाबतही चर्चा केली. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक हेमराज पाटील, जयश्री वंडोळे यांनी मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...