आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला जखमी:दाेन वर्गखाेल्यांच्या मध्यभागी किचन मध्ये कुकरचा स्फाेट

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील इस्लामपुरा भागातील के.के. उर्दू गर्ल्स हायस्कूलमध्ये आठवड्याभरापूर्वी किचनमध्ये कुकरचा स्फाेट हाेऊन एक महिला जखमी झाली. दाेन वर्गखाेल्यांच्या मध्यभागी असलेल्या या किचनमध्ये तीन भरलेले गॅस सिलिंडर होते. ते फुटले असते तर मोठा अनर्थ झाला असता. स्फोट काम करणाऱ्या महिलांच्या चुकीमुळे झाला असे सिद्ध करण्यासाठी शाळा प्रशासनाने महिलांवर दबाव टाकला. परिणामी विद्यार्थ्यांना आठवड्याभरापासून पोषण आहार देण्यात आलेला नाही. या प्रकाराबाबत शिक्षण विभागातर्फे तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भरवस्तीत असलेल्या या शाळेत हजारावर विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता कुकरमध्ये डाळ शिजवण्यासाठी ठेवली असता अचानक कुकरचा स्फोट झाला. त्यात साबेराबी अरमान खान ही ४५ वर्षीय महिला सेविका भाजली गेली. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, शाळेतील अनेक विद्यार्थिनी घाबरल्या.

गटशिक्षणाधिकारी पाहणी करून शिक्षण विभागास देणार अहवाल
घटनेची माहिती मिळताच जळगाव येथील गटशिक्षणाधिकारी आणि पोषण अधीक्षकांनी शाळेत भेट देऊन पाहणीही केली. याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यत आल्या असून, त्यानंतर कारवाई हाेईल. - विकास पाटील, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

बातम्या आणखी आहेत...