आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा नाेंदव:नवीन रस्ता खाेदल्यास गुन्हा नाेंदवणार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पीडब्लूडीमार्फत रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे जलवाहिनी शिफ्टिंग, नळ जाेडणी, गटारींचे कामे वेळेत पूर्ण करा. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर नवीन रस्त्यावर खाेदकाम केल्यास मनपाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला.

शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे. ३८ काेटी रुपयांतील पहिल्या टप्प्यात दहा रस्त्यांच्या कामांना एनआेसी दिली आहे. त्यामुळे मक्तेदाराने कार्यादेश दिल्यानंतर तीन महिन्यांनी काेर्ट चाैक ते गणेश काॅलनी रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

दाेन्ही बाजूने प्रत्येकी साडेसात मीटर रुंदीचा रस्ता तयार केला जाणार आहे. त्यासाठी काही ठिकाणी खडी व मुरूम टाकून डब्ल्यूबीएम केले जात आहे. तर काेर्टासमाेर गटारीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामांची जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी साेमवारी सायंकाळी पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत येळाई, मनपाचे अभियंता नरेंद्र जावळे, संजय नेमाडे, संजय नेवे व याेगेश वाणी उपस्थित हाेते. काेर्ट ते नूतन मराठा महाविद्यालयादरम्यान गटारीसाठी रस्त्यावर खाेदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे काेर्टाकडून गणेश काॅलनीकडे जाण्याचा व येण्याचा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.

मनपाचे कर्मचारी हजर ठेवा : मक्तेदाराकडून रस्त्याचे खाेदकाम करताना काेणत्या ठिकाणी जलवाहिनी आहे. कुठे नळ जाेडणी आहे याची माहिती मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना असते. त्यामुळे रस्त्याचे खाेदकाम सुरू असताना पूर्ण वेळ मनपाचे अधिकारी व कर्मचारी जागेवर हजर ठेवा अशा सूचना देण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...