आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नथंडी कायम राहणार:तापमानात घट; पारा 11 अंशांवर

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील किमान तापमानामध्ये घट झाली आहे. रविवारी किमान तापमान ११ अंश तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. कमाल आणि किमान तापमानात घट झाल्याने थंडीमध्ये काहीशी वाढ झालेली आहे. मंगळवारपर्यंत थंडी कायम राहणार असून, त्यानंतर वातावरण ढगाळ हाेऊन पुन्हा तापमानात वाढ हाेण्याची शक्यता आहे.

डिसेंबरमध्ये किमान तापमानात माेठा चढ-उतार झाल्याने महिनाभर थंडीची तीव्रता कमी-अधिक हाेती. जानेवारीत पहिल्याच दिवशी तापमान ११ अंशांच्या नीचांकावर आहे. मंगळवारनंतर दाेन-तीन दिवस ढगाळ वातावरण वगळता या महिन्यातील पहिला पंधरवडाही थंडीचा असेल. किमान तापमानात घट हाेऊन पारा ८ अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. या आठवड्यात शुक्रवारपासून थंडीची तीव्रता आणखी वाढू शकते, असा अंदाज स्थानिक हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

उत्तरेतील वाऱ्याचा प्रभाव वाढणार :
या आठवड्यात उत्तरेतून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी वाढू शकते. जानेवारीच्या पहिल्याच पंधरवड्यात थंड वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट येईल, असा अंदाज आहे.

'पुन्हा शेकाेट्या पेटल्या
गेल्या काहि दिवसांपासून थंडी गायब हाेवून उष्णता वाढली हाेती. त्यामुळे गावागावात हाेणाऱ्या शेकाेट्या पेटणे बंद झाले हाेते. मात्र, नवीन वर्षाची सुरुवात हाेताच थंडीचा जाेर वाढल्याने पुन्हा गावागावात शेकाेट्या पेटायला लागल्या आहेत.

धुक्यात वाढ.....
वाढत्या थंडीसाेबतच जिल्ह्यात धुक्याचे प्रमाणही वाढत आहे. या रविवारी धुक्यामुळे दृश्यमानता पहाटेच्या वेळी अवघ्या ७०० मीटरपर्यंत कमी झालेली हाेती. या आठवड्यात धुक्याचे प्रमाणही वाढू शकते. उत्तरेत धुक्यामुळे रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत.

बातम्या आणखी आहेत...