आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात दाेन दिवसांनी झाले सूर्यदर्शन:दिवसा थंडीत घट, किमान तापमान आता 15 अंशांवर

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगावकरांना गेल्या दाेन दिवसांपासून महाबळेश्वरचा अनुभव येताे आहे. राज्यातील सर्वात थंड शहरापेक्षाही गारठलेले शहर म्हणून जळगावची नाेंद झाली. राज्यात सर्वाधिक कमी तापमानाची नाेंद झाल्याने जनजीवनावर परिणाम झाले हाेते. दरम्यान दाेन दिवसानंतर वातावरणात बदल झाला. गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी दिवसाचे वातावरण निवळले हाेते. हवामान विभागाच्या नाेंदीनुसार जळगावातील कमाल तापमान २२.९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५.२ अंश सेल्सिअस हाेते. आगामी तीन दिवसांत रात्रीच्या तापमानात आणखी घट हाेण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात साेमवार व मंगळवारी किमान तापमानात माेठ्या प्रमाणात घट हाेऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...