आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादूध संघाच्या निवडणुकीत २० पैकी १६ जागा जिंकणाऱ्या दाेन्ही मंत्र्यांच्या नेतृत्वातील पॅनलने सत्ता मिळवली आहे. रविवारी सकाळी ९ वाजता चेअरमनपदाची निवड केली जाणार आहे. या पदासाठी आमदार एकनाथ खडसेंना आव्हान देऊ शकेल अशा आक्रमक चेहऱ्याला ही संधी द्यावी असा निकष ठेवण्यात आला आहे. त्यात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण हे प्रबळ दावेदार आहेत.
निवडणुकीत ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनलने आमदार खडसेंच्या नेतृत्वातील पॅनलचा पराभव करून संघातील खडसेंची सात वर्षांची सत्ता उलथून लावली आहे. या निवडणुकीत थेट मंदाकिनी खडसेंचा पराभव करणारे आमदार मंगेश चव्हाण हे निवडणुकीच्या आधीपासूनच इथे आक्रमक आहेत.
भाजपचाच आहे दावा
दूध संघातील आमदार खडसेंची सत्ता उलथून लावण्यात मंत्री गिरीश महाजन, आमदार चव्हाण हे आघाडीवर हाेते. भाजपचे ८ संचालक निवडून आले. त्यामुळे संघावर सत्ता स्थापनेचा दावा भाजपकडून केला जाताे आहे. राष्ट्रवादीचे ७ तर शिंदेसेनेचे ५ संचालक निवडून आले आहेत.
पर्यायी नेतृत्वाची नावे
संजय पवार, भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची नावेदेखील भाजकडून चेअरमन पदासाठी चर्चेत आहेत. तर शिंदेसेनेकडून आमदार चिमणराव पाटील यांचे नाव पुढे येते आहे. पण आमदार चव्हाण यांनी चेअरमनपद स्वीकारण्यास नकार दिला तर या नावांचा पर्याय पुढे येऊ शकताे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.