आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरत्या वर्षाला निराेप व नविन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पाेलिस दलातर्फे शहरात विशेष वाहन तपासणी माेहिम राबवण्यात आली. माेहिमेत वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या ४१२ चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २ लाख ४८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तर मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्या ४७ चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
हाेम डीवायएसपी संदीप गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरतील शहर, शनिपेठ, जिल्हापेठ, रामानंदनगर, तालुका पाेलिस ठाणे व एमआयडीसी अशा सहा पाेलिस ठाण्याच्या पथकांसह शहर वाहतूक शाखेतर्फे शहरात ३० व ३१ डिसेंबर राेजी १६ ठिकाणी नाकाबंदी करून वाहन तपासणीसह ब्रीथ अॅनेलायझरद्वारे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यात नियमांचा भंग करणाऱ्या ४१२ वाहनचालकांना २ लाख ४८ हजारांचा दंड ठाेठावण्यात आला. तर ४७ जण मद्य प्राशन करून वाहन चालवताना आढळून आले. दाेन दिवसाच्या या माेहिमेत थर्टीफर्स्टच्या संध्याकाळपासून रात्रीपर्यंत २२८ जणांनी वाहतूक नियमांचा भंग केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.