आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखोटेनगरजवळ मंगळवारी दुपारी दोन दुचाकींमध्ये अपघात होऊन त्या रस्त्यावर पडलेल्या असताना त्यांना वाचवण्याचा प्रयत्नात ट्रॅक्टर राँग साइडला घुसून चार दुचाकी व एक कार यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात चार जण जखमी झाले. जखमींना खासगी तसेच जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. राष्ट्रीय महामार्गावर खोटेनगरजवळ असलेल्या हॉटेल राधिकासमोर दोन दुचाकींमध्ये धडक झाली. या दोन दुचाकी रस्त्यावर पडलेल्या असताना शहराकडे येत असलेल्या ट्रॅक्टर चालकाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न राँग साइडला ट्रॅक्टर घातले. यावेळी दोन दुचाकी व एक कार ट्रॅक्टरवर येऊन आदळले. या विचित्र अपघातात चार जण जखमी झाले. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्यांची नावे अद्याप कळू शकले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.