आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा वार्षिक योजनेतर्गत जनसुविधा योजनेमधून अंतिम सुधारित तरतुदीद्वारे जिल्ह्यात १२४ ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी २७ कोटी २८ लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. १२४ गावांत ग्रामपंचायतींची फर्निचरसह सुसज्ज अशी इमारत उभारली जाणार आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नियोजन समितीतून ग्रामपंचायतींना स्वत:च्या सुसज्ज कार्यालय बांधण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नुकतीच या इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यासाठी ९०% म्हणजे २३ कोटी ५६ लाख रूपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे वितरित केला. नवीन कार्यालयात सुसज्ज सुविधा असतील. सरपंच आणि ग्रामसेवक यांना बसण्यासाठी कॅबिन असेल. विविध बैठकींसाठी सभागृहाची तरतूद आहे. प्रसाधन गृहाची व्यवस्था करता येईल.
या गावांना मिळणार नवीन ग्रामपंचायत कार्यालय
अमळनेर तालुका : गांधली, जळोद , वाघोदा, नंदगाव , लोणसीम, बहादरवाडी व डांगरी प्रगने. बोदवड तालुका : भानखेडा, मानमोडी व हिंगोणे. भुसावळ तालुका : ओझरखेडा, शिंदी, मोंढाळे, गोजोरा व वराडसीम. चाळीसगाव तालुका : कुंझर, लोंढे, चैतन्यतांडा, इच्छापुर तांडा, बेलदारवाडी, ओझर व पिंपरी खुर्द. एरंडोल तालुका : आनंदनगर, हनुमंतखेडे बुद्रुक, ब्राह्मणे, सोनबर्डी, गालापूर, रवंजे खुर्द, निपाणे, भातखेळा व टोळी. जळगाव तालुका : दापोरा, तुरखेडा, सुभाषवाडी, तरसोद, धानवड व पिलखेडा, जामनेर तालुका : वडगाव बुद्रुक, कुंभारी बुद्रुक, ओझर, लोंढरी बुद्रुक , एकुलती, वाकी खुर्द, मोहाडी, पळासखेडा बुद्रुक, देवळसगाव, सामरोद व शेरी. मुक्ताईनगर तालुका : धामणगाव, काकोडा, इच्छापुर, निमखेडी व चारठाणा. पाचोरा तालुका : सावखेडा खुर्द, होळ, डोकलखेडा, आसनखेडा, परधाडे, वरसाडे प्र. बो. पिंप्री बुद्रुक प्र.भ. , सारवे बु.प्र.भ., अंतुर्ली बुद्रुक, पिंप्री बु.प्र.पा. (डांभुर्णी), सारोळा खुर्द, मोंढाळे, सांगवी प्र.लो.- कुऱ्हाड, भडगाव तालुका : बांबरुड प्र.ब. पथराड, शिंदी व कोळगाव, पारोळा तालुका : कन्हेरे, शेवगे बुद्रुक, सावखेडे होळ, म्हसवे, मुंदाणे प्र.अ., टोळी, तरवाडे, करंजी, कंकराज, कोळपिंप्री, ढोली, शिरसमणी, मंगरूळ व लोणी बुद्रुक, धरणगाव तालुका : रेल, कवठाळ, शेरी, पिंपळेसिम, बिलखेडा, चांदसर, अनोरे, भोणे, जांभोरे व कंडारी. चोपडा तालुका : घुमावल, वडोदा, नरवाडे, मेलाणे, वैजापूर, सुटकार, उमर्टी, कमळगाव व देव्हारी. रावेर तालुक्यात कोचुर बुद्रुक, निरूळ , वाघाडी, वाघोड, शिंदखेडा, मोरगाव बुद्रुक, धामोडी, उदळी बुद्रुक, मंगरूळ, उटखेडा, निमड्या, आंदलवाडी, रणगाव व रायपूर आणि यावल तालुक्यात आडगाव, म्हैसवाडी, बामणोद, मोहराळा, अट्रावल, कोरपावली या गावाचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.