आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चातुर्मास प्रवचनात जयपुरंदर मुनी यांनी व्यक्त केले मत:खाणे, झोपणे यामध्ये किमान तीन तासांचे अंतर आवश्यक

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विचारांत शुद्धी आणण्यासाठी ‘मेरी भावना’ सारख्या रचना उपयोगी ठरतात. शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करावा लागतो; तर मनाला स्वस्थ ठेवण्यासाठी, मनात शुभ विचार यावे म्हणून ‘मेरी भावना’ रचना म्हणजे टॉनिकचेच काम करते. जितकी तनाची तितकीच मनाची स्वस्थता महत्त्वाची आहे, असे मत अनुप्पेहा ध्यान प्रणेते डॉ. पदमचंद्र मुनी यांचे शिष्य जयपुरंदर मुनी यांनी ‘मेरी भावना’ चातुर्मास प्रवचनात व्यक्त केले.

‘नहीं सताऊ किसी जीव को…’ ह्या ओळीचे विश्लेषण मंगळवारच्या प्रवचन झाले. ‘द्रव्य’ हिंसा व ‘भाव’ हिंसा ह्या दोन प्रकारच्या आहेत. द्रव्य व भाव हिंसा एकत्र आल्यावर कर्मबंध व पाप जास्त निर्माण होतात. त्यामुळे दोन्ही हिंसा करू नये. दैनंदिन जीवनात कोणतीही कृती करत असताना ‘यत्ना जोडा सर्व क्रियांमध्ये’ असे आगम ग्रंथात सांगितले आहे. भूक पेक्षा कमी खावे, रात्री भोजन करू नये, खाणे व झोपणे यामध्ये किमान तीन तासांचे अंतर ठेवावे, असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...