आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भव्य दंगल:शहरात रविवारी कुस्त्यांची भव्य दंगल; विविध समित्या करण्यात आल्या गठीत़

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कुस्त्यांची दंगल केशव स्मृती प्रतिष्ठान आणि श्रीराम मंदिर संस्थानतर्फे श्रीराम रथोतत्सवानिमित्ताने ६ नोव्हेंबर रोजी शिवतीर्थ मैदानावर दुपारी ३ ते रात्री ९ या दरम्यान कुस्त्यांची भव्य दंगल आयोजित केली आहे. यंदा प्रथमच आंतरराष्ट्रीय कुस्ती लक्षवेधी ठरणार असल्याची माहिती केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

श्रीराम मंदिर संस्थांनतर्फे रथोत्सव आटोपल्यानंतर कुस्त्यांच्या दंगलीची परंपरा संत अप्पा महाराज यांच्या काळापासून होती; मात्र नंतर ही परंपरा खंडित झाली. केशवस्मृती प्रतिष्ठानने गेल्या सात वर्षांपासून ही कुस्त्यांची दंगल पुन्हा सुरू केली. जिल्ह्यात नव्हे तर राज्यातील विविध भागातून मल्ल यात सहभागी होतात. या दंगलीनिमित्ताने केशव स्मृती प्रतिष्ठान आणि श्रीराम मंदिर संस्थानतर्फे विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

यात समितीचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील, आखाडा जोड प्रमुख सुनील शिंदे, कार्याध्यक्ष राहुल वाघ, उपाध्यक्ष दिलीप कोळी, सचिव दीपक गवळी, माधवराव कुलकर्णी, डॉ. शांताराम सोनवणे, विजय वाडकर, चत्रभूज सोनवणे, दत्तू भामरे यांच्याकडे ही धुरा देण्यात आली आहे. या वेळी उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख दीपक जोशी, राहुल वाघ, प्रशांत जगताप, अनिल माकडे, सागर येवले, विजय वाडकर आदी उपस्थित होते.

यंदा मुलींच्या कुस्तीची दंगल ही लक्षवेधी ठरणार
यंदा प्रथमच भारत मदने (पुणे) विरुद्ध जॉर्जिया येथील टॅडो पहिलवान अशी आंतरराष्ट्रीय कुस्ती शहरात रंगणार आहे. या कुस्ती महोत्सवात राज्यातील पुणे, संभाजीनगर, खंडवा, धुळे, कोल्हापूर, भोपाळ, बारामती यासह जिल्ह्यातील विविध भागातून मल्ल येणार आहेत. तसेच या दंगलीत मुलींच्या कुस्तीही लक्षवेधी ठरणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे सचिव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बातम्या आणखी आहेत...