आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा९४.३ मायएफएमतर्फे ‘माय शॉर्ट ब्रेक’हा उप्रकम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत मायएफएमचे आरजे देवा विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत. दररोजच्या कामाच्या व्यापातून थोडासा वेळ काढून स्वतःमधील कला गुणांना वाव देण्याची एक उत्तम संधी या निमित्ताने कर्मचाऱ्यांना प्राप्त करून देण्यात येत आहे. पोलिस दलातील कर्मचाऱ्यांसाठी कांताई सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला.
यात पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनी विविध कलांचे सादरीकरण केले. कार्यक्रमात गायन, डान्स, वादन, कविता सादरीकरण अशा विविध कला सादर करण्यात आल्या. नेहमीच्या व्यग्र दिवसातून थोडा विरंगुळा मिळाल्यामुळे पोलिस बांधवही आनंदी झाले. यावेळी मायएफएमतर्फे पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना भरघोस बक्षीस दिली जात आहेत. जर तुम्हाला तुमच्या कंपनीत आरजे देवा व मायएफएमच्या टीमला बोलवायचं असेल तर ८५५१९४३९४३ या मोबाइल क्रमांकावर तुमच्या कंपनीचे डिटेल्स व्हाॅट्सअॅप करा. अशाच विविध उपक्रमांसाठी ऐकत रहा ९४.३ मायएफएम आणि वाचत रहा दैनिक दिव्य मराठी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.