आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिलांना आभूषणांचे प्रचंड आकर्षण असते. त्यात युवा अवस्थेत त्याची आेढ अधिक असते. विविध मनाेरंजन वाहिन्यांवरील मालिका, रिअॅलिटी शाेमधील महिला कलाकारांकडून वापरले जाणारे वेगवेगळे आकर्षक दागिने आपल्याजवळही असावेत, अशी भावना असते. त्यात ऑनलाइनवर फॅन्सी, आर्टिफिशियल अंगठ्यांना तरुणींकडून माेठ्या प्रमाणात पसंती मिळते आहे.
जिल्ह्यात आर्टिफिशियल दागिने विक्री करणारे २५पेक्षा अधिक हाेलसेल व्यापारी आहेत. त्यांच्याकडे काेलकाता, जयपूर व मुंबई येथून अमेरिकन डायमंडच्या अंगठ्या येतात. तर राजकाेट, अहमदाबाद येथून नियमित पितळी नक्षीकामाच्या अंगठ्यांची आवक हाेते. मालिकांमध्ये महिला कलाकार घालत असलेल्या डिझाइनसह नियमित वापराच्या अंगठ्या अगदी पाच रुपयांपासून ते पार्टिवेअर्स, एक-दाेनदा वापरायच्या अंगठ्या एक ते दाेन हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. त्यातील नक्षीकाम, वेगळेपण, त्यावर लावलेल्या डायमंडची संख्या यावर किंमत ठरत असल्याचे व्यापारी दीपक लुंकड यांनी सांगितले.
यातही आपापल्या आर्थिक स्तरानुसार मध्यमवर्गीय महिला शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत, कामगार वर्गातील महिला शंभर रुपयाच्या आत नेहमी वापरून खराब होणार नाही अशा तर उच्चभ्रू वर्गातील महिला एक-दोन वेळा वापरण्याच्या दृष्टिकोनातून तसेच वेगवेगळ्या प्रसंगासाठी वेगळी डिझाइन व कलाकृती असलेल्या अंगठ्यांना पसंती देतात. वाढदिवस, विविध छाेटेखानी समारंभाला हजेरी लावण्यासाठी जाताना तरुणी या फॅन्सी अंगठ्या घालतात. जसा पाेषाख तशी डिझाइन असलेली अंगठी निवडण्यावर अनेक तरुणी भर देतात. दरवर्षी वेगवेगळ्या डिझाइन येत असल्याचे सराफा व्यावसायिकांकडून सांगितले जाते.
जिल्ह्यात २५ पेक्षा अधिक आर्टिफिशियल दागिने विक्री करणारे हाेलसेल व्यापारी तर किरकाेळ विक्रेत्यांची संख्या काही शेकड्यात आहे. दिवसाला या दागिन्यांची काेट्यवधीत उलाढाल हाेते. त्यात अंगठ्या विक्रीचे प्रमाण १५ ते २० टक्के आहे. त्याची उलाढाल किमान एक ते सव्वा काेटीच्या जवळपास असल्याचा अंदाज आहे.
पावसाळ्यात येतात नवीन डिझाइन
साेन्याच्या दागिन्यांत विशेष मेहनत करून कारागीर डिझाइन बनवतात. या कारागिरांना पावसाळ्यात मंदी असते. हाताला गाेल्ड मार्केटमधून फारशे काम मिळत नाही. म्हणून ते या काळात आर्टिफिशियल मार्केटमध्ये किमान २५ टक्के साेन्याच्या डिझाइन देऊन आपला उदरनिर्वाह भागवतात. त्यामुळे या काळात अधिक नवीन डिझाइन येतात. त्या ग्राहक आवडीनुसार निवडण्यावर अधिक भर देतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.