आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुलांच्या शिक्षणासाठी जळगावात रहिवासासाठी आलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या बंद घराचा लॅच-की असलेला दरावाजा ताेडून चाेरट्यांनी ५० हजार राेख रक्कमेसह सुमारे ४ लाखांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात घरफाेडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
माेतीलाला उर्फ मुकेश श्रावण साेनवणे (वय ५२, रा. इंद्रप्रस्थ काॅलनी, राेटरी भवन जवळ, जळगाव) हे मुलांच्या शिक्षणासाठी माेहाडीतून जळगाव येथे राहण्यासाठी आले आहेत. ते अधूनमधून माेहाडीतील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेल्या त्यांच्या घरी जातात. ३० नाेव्हेंबरला ते माेहाडीत जावून आले हाेते. त्यांना रविवारी सकाळी ११ वाजता त्यांचा लहान भाऊ नीळकंठ साेनवणे याने फाेन करून त्यांच्या घराचा दरवाजा ताेडलेला असल्याची माहिती दिली. ते जळगावातून माेहाडीतील घरी गेले असता त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाला लॅच-की असताना त्याच्या बाजुने दरवाजा ताेडून चाेरी झाल्याचे दिसले. चाेरट्यांनी तळमजल्यावर आईच्या खाेलीत व वरच्या मजल्यावरील बेडरुममधील सामान फेकलेले दिसले. या प्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पाेलिस ठाण्यात घरफाेडीचा गुन्हा दाखल झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.