आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:टेलिस्कोपद्वारे केली आकाशाची सफर‎

जळगाव‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहान वयातच विद्यार्थ्यांचे‎ आकाशाबद्दलचे कुतूहल वाढवा‎ असे प्रतिपादन खगोल अभ्यासक‎ अमोघ जोशी यांनी केले.‎ राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त‎ विज्ञानगाव कल्याणेहोळ येथे नोबेल‎ फाउंडेशन, ग्रामपंचायत‎ कल्याणेहोळ आणि विकास‎ सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने‎ अवकाश दर्शनाचा कार्यक्रम घेण्यात‎ आला. या वेळी खगोल तज्ज्ञ अमोघ‎ जोशी यांनी टेलिस्कोपच्या‎ माध्यमातून अबालवृद्धांना‎ आकाशाची सफर घडवली.

त्यामुळे‎ गावकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले‎ हाेते. या वेळी खगोल अभ्यासक‎ विजयसिंह पवार, सरपंच रमेश‎ पाटील, पोलिस पाटील भिका‎ पाटील, नोबेल फाउंडेशनचे‎ संस्थापक जयदीप पाटील आणि‎ समाधान पाटील उपस्थित होते.‎ गावकऱ्यांनी आकाश दर्शनाचा‎ आनंद घेताना उत्स्फूर्त प्रतिक्रिया‎ दिल्या. वयाच्या पन्नाशीनंतर‎ अनेकांनी प्रथमच दुर्बीण पाहिली व‎ त्यातून चंद्र पाहिला. समाधान‎ पाटील यांनी सूत्रसंचालन केले.‎ देवयानी पाटील यांनी आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...