आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाेरीचा गुन्हा दाखल:अपार्टमेंटमधून लॅपटाॅप; माेबाइलसह 66 हजारांचा ऐवज लंपास

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेहरूणमधील एका अपार्टमेंटमधील दाेन घरातून लॅपटाॅप, तीन माेबाइल व पर्स असा सुमारे ६६ हजार रुपयांचा ऐवज चाेरी झाल्याची घटना साेमवारी सकाळी ८.३० ते ९.३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उज्मा रियाज पटेल (वय २४, रा. आरएन अपार्टमेंट, सदाशिवनगर) या अपार्टमेंटच्या चाैथ्या मजल्यावर फ्लॅटमध्ये राहतात. साेमवारी सकाळी त्या झाेपलेल्या असताना त्यांचे वडील खाली गेलेले हाेते. जाताना त्यांनी घराच्या दराची बाहेरून कडी लावली हाेती. ते परत आले असता दरवाजा उघडा हाेता. त्यांच्या घरातून लॅपटाॅप, तीन माेबाइल, पर्स आदी चाेरट्यांनी लंपास केला आहे. तसेच देशमुखनगरात त्यांचे चुलत मामा असलम अब्दुल रशीद पटेल (वय ६१) राहत असून त्यांच्या घरातूनही दाेन माेबाइल व पर्स चाेरट्यांनी याच वेळेत लंपास केले आहे.

बातम्या आणखी आहेत...