आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोपडा ऑनर किलिंग:फिर्यादीत आरोपी म्हणून नाव नसलेल्या एका वकिलाची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा शहरात गेल्या आठवड्यात ऑनर किलिंगची घटना घडली होती. यात प्रेमीयुगूलाची हत्या करण्यात आली. या गुन्हयात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर फिर्यादीत आरोपी म्हणून नाव नसलेल्या एका वकिलाने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे.

वकीलाचा गुन्ह्याशी काय संबध?

त्यावर तीन दोन दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. दरम्यान, या वकीलाचा गुन्ह्याशी काय संबध आहे? याची माहिती पोलिस काढत आहेत. वकीलाने गुन्हा करण्यासाठी आरोपींना मदत केली आहे का?, कायदेशीरपणे पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केली आहे का? या बाबींवर पोलिसांचा तपास सुरू झाला आहे. वकीलाच्या सहभागाच्या संशयावरुन नियोजनबद्धपणे या हत्या केल्याचे तपासात समोर येते आहे.

प्रेम प्रकरणाच्या संशयातून वर्षा समाधान कोळी (वय 20, रा. सुंदरगगढी, चोपडा ) आणि राकेश संजय राजपूत (वय 22, रा. रामपूरा, चोपडा) या दोघांची हत्या 13 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन बालकांसह भरत संजय रायसिंग (वय 22 वर्ष रा. सुंदरगढी चोपडा ता. चोपडा), बंटी उर्फ जय शांताराम कोळी (वय 19 वर्ष रा. पंकज स्टाफ चोपडा ता. चोपडा), रत्नाबाई समाधान कोळी (वय 37वर्ष रा. सुंदरगढ़ी चोपडा ता. चोपडा), मयुर काशीनाथ वाकडे (वय 23 वर्ष रा. गणपती मंदिराजवळ अरुण नगर चोपडा ता. चोपडा), शांताराम अभिमन कोळी (वय 56 वर्ष रा. शिंदेवाडा चोपडा ता. चोपडा), आनंदा आत्माराम कोळी (वय 45 वर्ष रा. माचला ता. चोपडा), पवन नवल माळी (वय 22 वर्ष रा. पाटीलगढी चोपडा ता. चोपडा), रविंद्र आनंदा माळी (वय 20 वर्ष रा. माचला ता. चोपडा) अशा 11 संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या ऑनर किलिंग प्रकरणात आता नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. संशयित आरोपींनी कायदेशीर सल्ला घेऊन पुरावे नष्ट केल्याची जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे एका प्रतिष्ठीत वकिलाने आधीच अटकपूर्व जामीनसाठी कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर दोन दिवसांपासून सुनावणी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...