आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीषण अपघात:धुळ्याजवळ लक्झरी बस आणि गॅस टँकरचा भीषण अपघात, तिघांचा होरपळून मृत्यू

धुळेएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • भरधाव बस टँकरला मागून धडकली, दोन्ही वाहने खाक

तालुक्यातील अजंग गावाच्या शिवारात भरधाव लक्झरी बस गॅस टँकरवर धडल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील अजंग गावाजवळ सूरत-नागपूर महामार्गावर लक्झरी बस आणि गॅस टँकरचा भीषण अपघात झाला. यादरम्यान, बस गॅस टँकरला धडकल्यामुळे दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या घटनेत बसमधील दोघे तर गॅस टँकर चालकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. दरम्या, बसमध्ये अजून प्रवासी होते का, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. पण, बसमध्ये प्रवासी असल्याच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेत दोन्ही वाहने खाक झाली. अपघातामुळे सुरत नागपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मनपाच्या बंबमुळे आगीवर नियंत्रण मिळविता आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...