आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिस अधीक्षकांची घेतली भेट:बकालेंच्या अटकेसाठी राज्यातील मराठा समाजाची बैठक हाेणार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अटक करण्यात यावी, खातेंतर्गत चौकशी करून बडतर्फ करावे, या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे.

याचा एक भाग म्हणून बुधवारी समाजातील पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक एस. राजकुमार यांची भेट घेतली आहे. तसेच पुढील काळात बकालेेंविरुद्ध पोलिस प्रशासनाने योग्य ती कारवाई वेळेवर न केल्यास जळगावात राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील पदाधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती समाजातर्फे देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...