आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच हजार रुपयांचा आकारला दंड:बंद कुलरमध्ये लपवलेला नायलॉन मांजा केला जप्त

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संक्रांतीचा सण तांेडावर आलेला असताना पतंगोत्सवाची तयारी नागरिक करीत आहेत. त्यातच बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. महापालिकेच्या पथकाने जोशीपेठेत तपासणी केली असता एका दुकानात बंद कुलरमध्ये नायलॉन मांजा लपवून विक्री होत असल्याचे आढळून आले.

पालिकेचे विभागीय स्वच्छता निरीक्षक जितेंद्र किरंगे यांच्या पथकाने मंगळवारी जोशीपेठेतील ११ दुकानांची अचानक तपासणी केली. या वेळी वृतिक पुरन खिची यांच्या दुकानात बंदी असलेला नायलॉन मांजा आढळून आला. खिची यांनी हा मांजा एका बंद अवस्थेतील कुलरमध्ये लपवून ठेवलेला होता. या प्रकरणी पालिकेने खिची यांच्यावर पाच हजार रुपये दंडाची कारवाई केली. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाने नायलॉन मांजा विक्री करणे आणि बाळगण्यावर बंदी आहे. त्यामुळे विक्रेत्यांकडे हा मांजा आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असे महापालिकेकडून कळवण्यात आले आहे. दरम्यान, सन २०२१मध्ये नायलॉन मांजा गळ्यात अडकून एका २३ वर्षीय डॉक्टरची मान कापली गेली होती. त्यांच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सुदैवाने त्यात त्यांचे प्राण वाचले हाेते. त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची आहे.

बातम्या आणखी आहेत...