आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिसरात खळबळ:शिवाजीनगर पुलाखाली दीड महिन्याचे मृत अर्भक आढळले

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवाजीनगर उड्डाण पुलाखाली दीड महिन्याचे मृत अर्भक आढळून आले आहे. या घटनेमुळे शिवाजीनगर परिसरात खळबळ उडाली आहे.शिवाजीनगर उड्डाण पुलाचे काम अद्याप पूर्ण हाेणे बाकी असून पुलाच्या खाली मातीचे ढिगारे, खड्डे आहे. यातील मातीच्या ढिगाऱ्यावर शाल व कापडामध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत एक अंदाजे सव्वा ते दीड महिन्याचे पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत पडलेले नागरिकांना आढळून आले.

त्यांनी शहर ठाण्याच्या पाेलिसांना व नगरसेवक राजेंद्र मराठे यांना कळविले. त्यानंतर पाेलिस घटनास्थळी दाखल हाेऊन रुग्णवाहिका मागवून मृत अर्भकाला शासकीय वैद्यकीय महाविद्यलयाच्या रुग्णालयात नेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...