आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथदिवे अंडरपासचा समावेश:रेल्वे मार्गामुळे बाधित हाेणाऱ्या परिसरात काॅरीडाेरसाठी महारेलकडे दिला प्रस्ताव

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून जाणाऱ्या मध्य व पश्चिम रेल्वेमुळे शहर तीन भागात विभागले गेले आहे. सुमारे ३३ किलाेमीटर लांबीच्या रेल्वे लाइनमुळे दळवळणाचा प्रश्न निर्माण हाेताे. याशिवाय रेल्वे लाइनला लागून असलेल्या भागात वाहतुकीसाठी अंडरपास, पादचारी मार्गासह रस्ते, गटारी व पथदिव्यांची सुविधा ‘महारेल’च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महापालिकेने राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह महारेलच्या मुख्य सचिवांना दिला आहे.

रेल्वे मार्गामुळे शहराचे तीन भाग, सेवासुविधांना अडचणी { मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेच्या पलिकडे शहराच्या उत्तर बाजुस शिवाजी नगर, गेंदालाल मिल परीसर, दाळफळ परिसर (जुनी व्यापारी बाजारपेठ) या भागात १५ टक्के लाेकसंख्या आहे. {पिंप्राळा, मुक्ताईनगर, प्रेम नगर, भाेईटे नगर, निमखेडी भागात २० % लाेकसंख्या आहे. {तिसऱ्या टप्प्यात शहराचा उर्वरीत भाग येताे. या परिसराची लाेकसंख्या शहराच्या ६५ टक्क्यापर्यंत आहे. ^रेल्वे मार्गामुळे शहराचे तीन भाग झाले. त्यांना सुविधा देणे गरजेचे आहे. रेल्वे काॅरीडाेर जाहीर झाल्यास महारेलकडून सेवा देता येतील. यासाठी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसह महारेलच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आला आहे. - जयश्री महाजन, महापाैर

बातम्या आणखी आहेत...