आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीमधून दागिने चोरीला:बसमधून वृद्ध महिलेची तीन लाखांचे दागिने असलेली पर्स लंपास; आरोपीवर गुन्हा दाखल

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी बसमध्ये चढत असताना चोरट्याने एका वृद्धेच्या पर्सची चेन उघडून त्यातील तीन लाख नऊ हजार रुपयांचे दागिने लांबवले. ही घटना 27 जून रोजी सायंकाळी पारोळा बसस्थानकात घटली. दरम्यान आरोपीवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, आशाबाई विश्वास पाटील ह्या धुळे येथे सुनेस भेटण्यासाठी निघाल्या होत्या. पारोळा बस स्थानकात बराच वेळ वाट पाहिल्यानंतर धुळे जाणारी बस आली. या बसमध्ये चढत असताना आशाबाई यांची पर्स कुणीतरी ओढत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे त्या बसमधून खाली उतरल्या. पर्स तपासली असता तीची चेन उघडी होती. या पर्समध्ये ठेवलेला सोन्याचा हार, राणीहार, बांगड्या, अंगठ्या असा 3 लाख 9 हतार दागिन्यांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. आशाबाई यांनी परिसरात चौकशी केली परंतु, चोरटा सापडला नाही. यानंतर त्यांनी पारोळा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार बापुराव पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.