आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:चेहरा पूर्ण झाकणाऱ्या स्कार्फने शरीरातील‎ पाण्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत‎, त्वचेच्या आजारांपासूनही बचाव

प्रतिनिधी | जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोपी किंवा हेडस्कार्फ बांधले‎ म्हणजे उन्हापासून आपले संरक्षण‎ झाले असे नाही तर कान, नाक‎ आणि तोंड या ज्ञानेंद्रियांमधून‎ प्रामुख्याने सूर्यकिरणे शरीरात प्रवेश‎ करत असल्याने या तीन गोष्टी‎ झाकल्या जाणे गरजेचे आहे. या‎ पार्श्वभूमीवर यंदा बाजारात‎ डोक्यातून घालता येणारा स्कार्फ‎ आला आहे. शरीरावर सूर्यकिरणे‎ पोहोचू शकत नसल्याने शरीरात‎ पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास‎ मदत होईल, असे त्वचारोग तज्ज्ञांनी‎ दिव्य मराठीला सांगितले.‎

उन्हाळा म्हटला की घाम येणे,‎ गरम होणे अशा गोष्टींचा विचार‎ मनामध्ये येतो; परंतु उन्हाळ्यामध्ये‎ वापरणारे कपडे हा फॅशनशी‎ संबंधित चर्चेचा विषय मानला‎ जातो. या गरम सीजनमध्ये समर‎ ड्रेसेस, स्कार्फ, गॉगल्सही कूल‎ आणि कम्फर्टचा अनुभव देत‎ असतात. बाहेर जाताना उन्हापासून‎ रक्षणही व्हावे व आपली फॅशनही‎ जपली जावी याकडे महिला व मुली‎ विशेष लक्ष देतात. त्यासाठी दरवर्षी‎ बाजारात आकर्षक असे नवनवीन‎ प्रकारचे स्कार्फ विक्रीसाठी येतात.‎ केसांच्या समस्या होतील‎ उन्हाच्या चटक्यामुळे काळी‎ पडणारी स्कीन आणि केस यांच्या‎ समस्या वाढतात; मात्र फेस कव्हर‎ करणाऱ्या स्कार्फने लूकही खुलतो.‎ उन्हाळ्यात ज्या प्रमाणे सौम्यरंगांचे‎ आणि ढिले कपडे वापरावे. टाइट‎ जीन्स आणि भडक कपडे वापरणे‎ टाळावे टोपीचा वापर करावा.‎

भविष्यातील त्वचेचे बदल कमी होतील‎

उष्माघातापासून बचावासाठी हेडस्कार्फ न वापरता संपूर्ण चेहरा‎ झाकला जाईल असा रुमाल वापरावा. त्वचेच्या समस्या व बदल‎ कमी होतील. भडक रंगाचे रुमाल किरणे आकर्षित करतात. म्हणून‎ ते वापरणे टाळा. - अमेय कोतकर, त्वचारोगतज्ज्ञ, जळगाव‎