आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशाेधन:विद्यापीठात इलेक्ट्राॅनिक चीपच्या तपासणीची अद्ययावत प्रयोगशाळा

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुतांश इलेक्ट्राॅनिक उपकरणात सूक्ष्म चिपचा वापर केलेला असतो. खान्देशातील विद्यार्थ्यांना या चिप्स बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. मात्र, त्यासाठी मुंबई आयआयटीत जावे लागत असे. ही बाब लक्षात घेऊन जळगाव विद्यापीठात साडेतीन कोटी निधीतून सेमिकंडक्टर वेफर प्रक्रियेसाठी धूलिकण विरहित प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जळगावातच चिप्स निर्मिती करून तिची परिणामकारकता तपासता येईल.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख प्रा. अशोक महाजन यांच्या गेल्या दोन दशकातील सेमिकंडक्टर टेक्नॉलॉजी क्षेत्रातील विविध संशोधन प्रकल्पांच्या माध्यमातून साडेतीन कोटी रुपयांच्या निधीद्वारे झालेल्या संशोधनातून सेमिकंडक्टर डिव्हायसेस (चिप्स) फॅब्रिकेशन व कॅरॅक्टरायझेशनसाठी उपयुक्त एमडीएलएन प्रयोगशाळेची निर्मिती संशोधक विद्यार्थ्यांच्या मदतीने केली आहे. या प्रयोगशाळेचे क्लास १०००० क्लीन रूम या अद्ययावत प्रणालीमध्ये धूलिकण विरहित व अतिसूक्ष्म तसेच दूषित न होणाऱ्या चिप्सच्या प्रक्रियेसाठी रुसा अंतर्गत मिळालेल्या निधीतून रूपांतर केले.

याचा होईल विद्यार्थ्यांना लाभ
प्रयोगशाळेत पीईएएलडी, आरटीपी आणि ई-बीम सिस्टिमचा समावेश आहे. त्या माध्यमातून सेमिकंडक्टर डिव्हायसेस (चिप्स) निर्मिती करता येणार आहे. एफटीआयआर, आयव्ही, सीव्ही सिस्टिमद्वारे निर्मित वेफर्सची परिणामकारकता तपासली जाईल. भविष्यात निर्माण होणारी मनुष्यबळाची कमतरता दूर होईल.

तासाभरात ८० वेळा बदलते हवा, क्लीन रूम गारमेंट‌्स परिधान करून प्रवेश आपल्या घरातील एसी हा तासाभरात दोन वेळेस हवा बदलतो. मात्र या अद्ययावत प्रयोगशाळेत धूलिकण विरहित प्राणलीसाठी वापरलेल्या हवा हाताळणी यंत्राद्वारे प्रतितास सुमारे ६०-८० वेळा हवा बदल केली जाते. संशोधक, विद्यार्थ्यांना प्रवेश करताना, काम करताना विशिष्ट क्लीन रूम गारमेंट्स परिधान करावे लागतात. या रूममध्ये एअर कर्टन, हेपा फिल्टर्स, एअर शॉवर प्रणालीद्वारे प्रवेश दिला जातो व केमिकल्स व इतर एसेंससाठी पास बॉक्सचा वापर करावा लागतो.

बातम्या आणखी आहेत...