आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छतावरून बैलास खाली उतरवण्यासाठी एकच गर्दी:बिथरलेल्या बैलाचा छतावरून पडून झाला मृत्यू

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐन पोळ्याच्या दिवशी नागरिकांनी बैल बिथरवला. हा बैल एका घराच्या छतावर चढला होता. त्यानंतर पुन्हा बैलाजवळ गर्दी, गोंधळ केल्याचे बैल छतावरून खाली पडला. शनिवारी सकाळी या बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. समाजमाध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.जळगाव तालुक्यातील वावडदा गावात ही घटना घडली. या गावात बैलाच्या मालकाने गावात बैल पळवल्यामुळे तो बिथरला. लोक आरडाओरड करीत असल्यामुुळे दमलेला बैल एका घराच्या छतावर चढला होता. या छतावरून बैलास खाली उतरवण्यासाठी एकच गर्दी झाली. काही जण जिन्यात थांबले, तरुणांनी रस्त्यावर गोंधळ घातला.

त्यामुळे बैल पूर्णपणे बिथरला होता. अखेर जिना नसलेल्या बाजूने बैलाने खाली उतरण्याचा प्रयत्न केला. परिणामी बैलाचा तोल गेल्याने सुमारे २० फूट उंचीवरून हा बैल जमिनीवर कोसळला. बेशुद्ध व जायबंदी झालेल्या बैलाच्या तोंडा, नाकातून रक्त वाहत होते. शुक्रवारी रात्री त्याच्यावर उपचार करण्यात आले. शनिवारी सकाळी बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वन्यजीव संरक्षक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वावडदा येथे चौकशी केली. घडलेल्या प्रकाराबाबत वन विभागाकडे तक्रार करणार असल्याचे वन्यजीवचे सचिव बाळकृष्ण देवरेंनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...