आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यतील सर्व ६६३ मशिदींना भोंग्याची परवानगी देण्यात आली आहे. तर २८१९पैकी ३७० मंदिरांनी परवानगी घेतली. पुढीत दोन दिवसात सर्व धार्मिक स्थळांनी परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगीशिवाय लाऊडस्पीकर वाजवल्यास पाच लाखांपर्यंतच दंड व गुन्हा दाखल होईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
धार्मिक स्थळांवर भोंगे आणि लाऊडस्पीकर लावण्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांची जिल्ह्यात अंमलबजावणी होत आहे. आजपर्यंत पोलिसांकडे भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावण्यासाठी अर्ज केलेल्या ६०८ मशीद आणि ३७० मंदिरांना अटी, शर्थीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याचा मुद्दा हाती घेतल्यानंतर राज्यातील सामाजिक आणि धार्मिक वातावरण बिघडले आहे.
जिल्हा पोलिस दलाने आतापर्यंत १५० पेक्षा अधिक मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीस दिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या आवाजाच्या मर्यादेबाबत तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस प्रशासन कामाला लागले आहे. जिल्ह्यात जो मागेल त्यांना अटी, शर्थीच्या अधीन राहून परवानगी देण्याचे धोरण जिल्हा पोलिस प्रशासनाचे आहे.
पाच लाखांपर्यंत दंड : ध्वनी प्रदूषणाचा नियम मोडल्यास, विना परवानगी लाऊडस्पीकर वाजवल्यास मुंबई पोलिस अॅक्टनुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यात दोन हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तर परवानगी घेऊन लाऊडस्पीकर वाजवणाऱ्यांसाठी नियम आहेत. त्यांचा भंग केल्यास पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी होऊन संबधितांना पाच लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. पोलिसांना नॉइज लेव्हल मिटर देण्यात येणार आहे. त्याचे प्रशिक्षण दिल्यानंतर कारवाईस सुरूवात होईल, असे डॉ. मुंढे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.