आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:रेल्वे उड्डाणपुलावर रद्दी नेणारा‎ ट्रक कलंडल्याने झाली काेंडी‎

जळगाव‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरणगाकडून जळगावकडे रद्दी घेऊन‎ जाणारा ट्रक महामार्गावरील रेल्वे पुलावर‎ कलंडल्याची घटना सोमवारी सकाळी‎ घडली. या अपघातात सुदैवाने जीवित‎ हानी झाली नाही. मात्र अपघातानंतर चार‎ तास महामार्गावर वाहतूक एकेरी केली‎ होती.

क्रेनद्वारे अपघातग्रस्त ट्रक बाजूला‎ करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.‎ वरणगावकडून जळगावच्या दिशेने‎ निघालेला ट्रक (एमपी.१२ एच .०४९३)‎ रेल्वे उड्डाणपुलावर सोमवारी पलटी झाला.‎ चालकाला किरकोळ दुखापत झाली.‎ पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. सुदैव‎ ट्रक रेल्वेलाइनवर काेसळला नाही.‎

बातम्या आणखी आहेत...