आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - धरणगाव महामार्गावर एकलग्नजवळ सोमवारी रात्री दुचाकी-कारचा अपघात झाला. धरणगाव येथे दिराच्या वर्षश्राध्दाचा कार्यक्रम आटोपून जळगावला दुचाकीवर परत येत असलेल्या महिलेचा या अपघातात मृत्यू झाला. त्यांचा मुलगा व नातही जखमी झाले आहेत. या प्रकरणी आज सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला असून, कार जप्त करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय ?
विजया भगवानसिंग पुर्भे (वय 55, रा. भिकमचंद, जैन नगर, जळगाव) असे अपघातात मृत महिलेचे नाव आहे. त्यांचा मुलगा चेतन पुर्भे याच्या डोक्याला, पायाला जबर दुखापत झालेली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची मुलगी दीप्ती हिच्या डोक्याला तीन टाके पडले आहेत. सोमवारी विजया यांच्या धरणगाव येथील दिराच्या वर्षश्राध्दाचा कार्यक्रम होता. त्यासाठी त्या मुलगा चेतन याच्या (एम. एच. 19 बी. आर. 3827) दुचाकीवर धरणगाव येथे गेलेल्या होत्या. हा कार्यक्रम संपल्यानंतर तिघे दुचाकीवर जळगावला येत होते. महामार्गावर एकलग्नजवळ मन्यार प्लास्टीक कंपनीसमोर कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीचे नुकसान झाले.
पोलिसांत गुन्हा दाखल
जखमींना रुग्णवाहिकेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी विजया यांना मृत घोषित केले. चेतन यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मुलीवर उपचार करुन घरी नेण्यात आले. या प्रकरणी कार चालकाविरुध्द पाळधी दूरक्षेत्र पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.