आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव:सुरतहून पायी निघालेल्या उत्तर प्रदेशच्या महिलेने रस्त्यातच दिला मुलीस जन्म

जळगाव2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनमध्ये हाताला काम नसल्याने महिलेच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली

पोटात बाळ मात्र अन्नाचा कण नाही... बाळाला जन्म देण्यासाठी जवळ काहीच नाही.. कोणत्याही क्षणी प्रसूती होईल, अशा परिस्थितीत जिवाची ना बाळाची कसलीही पर्वा न करता सुरतहून दोन दिवसांपूर्वी पायी प्रवासाला निघालेल्या परप्रांतीय महिलेने गुरुवारी पहाटे जळगावातील अायटीअायसमाेरील रस्त्यातच गोंडस मुलीला जन्म दिला.

लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. भुकेने व्याकूळ होण्यापेक्षा लोक कसलाही विचार न करता आपल्या पत्नी व लेकरांसह आपल्या गावाकडे पायी निघाले आहेत. गुजरात राज्यातील सुरत (लूम) येथे कापड विणकाम करणारे नूर मोहम्मद हे आपल्या पत्नी व मुलासह राहतात. लॉकडाऊनमध्ये हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. दरम्यान, काही दिवस उपाशी राहिल्यानंतर त्यांनी आपल्या गावी अर्थात उत्तर प्रदेशात जाण्याचे ठरवले. खिशात पैसे नाही, पोटात अन्नाचा कण नाही. त्यामुळे आपल्या गर्भवती पत्नीला अन् ३ वर्षाच्या लहान मुलाला सोबत घेऊन त्यांनी गावाची वाट धरली. नूर मोहम्मद (वय २७), पत्नी इशरत मोहम्मद नूर मोहम्मद (२६) व मोहम्मद नुमान (३) यांनी मंगळवारी सुरत येथून पायी निघाल्यानंतर दिवस-रात्र प्रवास करून ते गुरुवारी सकाळी जळगावात दाखल झाले. रात्रभर प्रवास केल्याने इशरत यांना पहाटे प्रसूती कळा सुरू झाल्या. त्रास असह्य झाल्याने त्या रस्त्यावरच कोसळल्या.

अन् रस्त्यावरच दिला बाळाला जन्म :

पहाटे ५.३० वाजता अचानक एक महिला रस्त्यावर असह्य वेदनांमुळे ओरडत असल्याने तेथील लोकांना नेमके काय झाले ते कळत नव्हते. कोरोनाच्या धास्तीने कोणी जवळ जाण्यास तयार नव्हते. बॅट विक्रेत्याने रुग्णवाहिका चालकला फोन करून बोलावून घेतले. जोपर्यंत रुग्णवाहिका आली तोपर्यंत बाळ पोटातून अर्धे बाहेर अाले व महिलेचा बराच रक्तस्त्राव झाला. बाळाला पूर्ण बाहेर आल्यानंतर महिलेला डॉ. विलास भोळे यांच्याकडे हलवण्यात आले. त्यानंतर गोदावरी रुग्णालयात नेण्यात आले असून बाळाची व महिलेली प्रकृती उत्तम आहे.

बातम्या आणखी आहेत...