आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीला मागून धडक:ट्रक अंगावरून गेल्याने महिला ठार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ येथे आजारी काकूला बघायला जात असलेल्या दांपत्याच्या दुचाकीला मागून धडक दिल्याने वाहनावरून पडलेल्या महिलेच्या अंगावरून ट्रक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना महामार्गावर मन्यारखेडा फाट्यासमाेर रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. मृत ३७ वर्षीय महिला ही एलआयसीच्या औरंगाबाद शाखेतील कर्मचारी आहे.

शिवाजीनगरातील रहिवासी शेषराव दीपके (४०) हे पत्नी शीतलसाेबत रविवारी दुपारी भुसावळ येथे काकूला बघण्यासाठी दुचाकीने जात हाेते. मन्यार फाट्यावरून जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने मागून जाेरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकी उसळली. त्यानंतर लगेचच पुन्हा दुसरी धडक दिली. त्यात मागील सीटवर बसलेल्या शीतल या रस्त्यावर पडल्या. त्यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने शरीराचा चेंदामेंदा झाला. तर माेटारसायकलचालक शेषराव दीपके यांना उजव्या डाेळ्याजवळ जखम झाली.

बातम्या आणखी आहेत...