आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:जळगावच्या समतानगरातील तरुणाने गळफास घेत जीवन संपवले; कारण अस्पष्ट

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समतानगरात राहणाऱ्या 38 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी सहा वाजता ही घटना उघडकीस आली. चेतन मनोरंजन सोनवणे (वय 38, रा. समतानगर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

घटना अशी की, चेतन हा पत्नी, दोन मुलांसह समतानगरात राहत हाेता. हातमजुरी करुन तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, मेहुणीचे लग्न असल्यामुळे त्याची पत्नी व मुले बाहेरगावी गेलेले होते. सोमवारी त्या घरी येणार होत्या. तत्पूर्वी घरी एकटाच असलेल्या चेतनने शनिवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी सहा वाजता नळांना पाणी आल्याने त्याचा भाऊ चेतनला झोपेतून उठवण्यासाठी गेला होता. यावेळी ही घटना उघडकीस आली.

चेतनने आत्महत्या का केली?

आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेेले नाही. दुपारी तीन वाजता शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर पाटील, प्रवीण जगदाळे तपास करीत आहेत. या घटनेमुळे सोनवणे कुटुंबीयांना धक्का बसला आहे. घरात खेळीमेळीचे वातावरण असताना देखील चेतनने असे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण कोणालाही कळाले नाही.

बातम्या आणखी आहेत...