आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिव्ह इन रिलेशनशिप:लिव्ह इन रिलेशनशिप सोडून आलेल्या युवतीला मैत्रिणीच्या घरातून ओढून युवकाने केले चाकूने वार ; श्यामरावनगरातील थरार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेली युवती सोडून आली. त्याचा राग असल्याने युवकाने तिचे केस धरुन मैत्रिणीच्या घराबाहेर ओढत तिच्या डोक्यावर व हातावर चाकूने वार करुन जबर जखमी केले आहे. वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही त्याने ठार मारण्याची धमकी देवून दहशत निर्माण केली. हा थरार श्यामराव नगरात बुधवारी सायंकाळी घडला आहे. दरम्यान, पोलिसात तक्रार देऊ नये म्हणून धमकावत तिघा मित्रांच्या मदतीने तिला रिक्षात डांबून शहरातील वेगवेगळ्या भागात फिरवून सोडून दिले. जखमी युवतीच्या जबाबावरुन गुरुवारी रात्री चौघांविरुध्द रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक केली असून युवतीवर चाकू हल्ला करणारा प्रियकर फरार झालेला आहे. बंटी उर्फ प्रद्युम्न नंदू महाले (रा. रामानंदनगर), अरबाज अमजद खान पठाण (रा. आझादनगर, गुलशन रजा चिश्तीया मशिदजवळ), समाधान हरचंद भोई (रा. खंडेरावनगर) व सोनू उर्फ समीर शेख लुकमान शेख (रा. पिंप्राळा हुडको) यांच्याविरुध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना पोलिसांनी अटक केली असून बंटी फरार झालेला आहे. गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही जप्त करण्यात आलेली आहे. बंटी व गंेदालाल मीलमध्ये राहणारी ती युवती गेल्या पाच ते सहा वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून ते दोघे धुळे येथे राहण्यास गेलेले होते. बंटीला दारुचे व्यसन लागलेले आहे. शिवाय तो कामधंदाही करीत नव्हता. त्यामुळे कंटाळून ती युवती त्याला सोडून काही दिवसांपूर्वी जळगावला आईकडे रहायला आली होती. बुधवारी सायंकाळी तिचा शोध घेत तो श्यामरावनगरात तिची मैत्रिण प्रतिभा पाटील यांच्या घरी गेला. तेथे त्याने युवतीचे केस पकडून मैत्रिणीच्या घराबाहेर फरफटत आणले. तिच्या हातावर व डोक्यावर चाकूने वार करुन जबर जखमी केले. त्यानंतर तिला रिक्षातून पळवून नेले. जखमी युवतीला जीएमसीत दाखल केले. रामानंदनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शांताराम पाटील यांनी रुग्णालयात जावून त्या युवतीचा जबाब घेतला.

बातम्या आणखी आहेत...