आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे देण्यावरून मित्राला मारहाण:नादुरुस्त माेबाइलचे पैसे देण्यावरून जळगावातील तरुणाचा चाॅपरने खून

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माेबाइल खराब केल्याने त्याचे पैसे देण्यावरून मित्राला मारहाण केली. यावेळी साेडवायला गेलेल्या २३ वर्षीय तरुणावर चाॅपरने हल्ला करून त्याचा खून करण्यात आला. रविवारी दुपारी ४ वाजता महामार्गालगत गणेश काॅलनीतील दारू अड्ड्याजवळ ही घटना घडली. त्यात आणखी दाेन जण जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कंत्राटी कामगार असलेला अक्षय अजय चव्हाण (वय २३) याचा मित्र गणेश याला बाळा पवार याने माेबाइल खराब केला म्हणून मारहाण केली हाेती. त्याबद्दल विचारणा व वाद मिटवण्यासाठी भारत याच्यासाेबत गणेश काॅलनीतील महामार्गालगतच्या देशी दारूच्या अड्ड्यावर गेला हाेता. बाेलणे झाल्यावर आपापल्या मार्गाने जात असताना बाळा साेबत असलेल्याच चारपाच जणांनी अचानक मारहाण सुरू केली. यात चाॅपरने अक्षयवर वार केले. तसेच युवराज माेतीलाल जाधव (वय १८, पिंप्राळा) याच्या पाठीत वार केला. युवराजचा मामा अमरसिंग आेंकार चव्हाण (नंदनवन काॅलनी) याच्या डाेक्यात दगड घालून जखमी केले. रक्तबंबाळ अवस्थेत अक्षय याला उपस्थितांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले असता त्याचा मृत्यू झाला. तर दाेन्ही जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हापेठ पाेलिसांत गुन्हा नाेंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती.

बातम्या आणखी आहेत...