आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:मेहरुण तलावावरून‎ तरुणाची साखळी चाेरली‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेहरुण तलावाच्या चाैपाटीवरील‎ बाकावर बसलेल्या तरुणाच्या‎ गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची ४०‎ हजार रुपये किंमतीची साेनसाखळी‎ माेटारसायकलवर आलेल्या दाेन‎ भामट्यांनी शनिवारी दुपारी‎ जबरदस्तीने हिसकावून नेली.

‎ प्रकरणी एमआयडीसी पाेलिस‎ ठाण्यात जबरी चाेरीचा गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे.‎ संकेत सुनील माळी (वय १९, रा.‎ जाेशी पेठ, जुने जळगाव) हा तरुण‎ शनिवारी दुपारी २.३० वाजता मेहरुण‎ तलावाच्या ट्रॅकवरील टपरी लगत‎ असलेल्या बाकावर बसला हाेता. या‎ वेळी काळ्या रंगाच्या विना‎ क्रमांकाच्या स्प्लेंडर‎ माेटारसायकलवर आलेल्या दाेन‎ जणांनी त्याला चाकूचा धाक‎ दाखवून साखळी लांबवली.‎

बातम्या आणखी आहेत...