आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसाद वाटप:गजानन महाराज मंदिरात अभिषेक, पाच हजार भाविकांना प्रसाद वाटप

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री संत गजानन महाराज बहुद्देशीय संस्थेतर्फे गजानन महाराज मंदिरात गुरुवारी श्री संत गजानन महाजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने ११ पुरोहितांनी केलेल्या मंत्राेच्चारात मूर्ती अभिषेक करण्यात आला. तसेच पाच हजार भाविकांनी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री संत गजानन महाराजांचा समाधी दिवस व ऋषिपंचमी निमित्त जीवनमोती सहकारी हौसिंग सोसायटी तथा श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यात सकाळी ६ वाजता भूषण मुळे, सुहास मोहरील यांच्यासह अकरा पुरोहितांकडून गजानन महाराजांच्या मूर्तीला अभिषेक व पूजा करण्यात आली. दुपारी १२ व रात्री ८ वाजता भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पाच हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतल्याचे जीवनमोती सोसायटीचे अध्यक्ष अरुण सोनवणे, उपाध्यक्ष अॅड. प्रकाश दप्तरी, सचिव मधुकर पाटील यांनी सांगितले. मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या हाेत्या. त्यात कुठल्याही प्रकारचा गाेंधळ हाेऊ नये म्हणून संस्थेतर्फे काळजी घेण्यात आली हाेती. आेंकारेश्वर भजनी मंडळातर्फे गजानन महाराज मंदिरात विमल कखरे, शाेभा चाैधरी यांच्यासह आठ जणांनी भजन सादर केले.

सायंकाळी भजन संध्या, रात्री प्रवचन
श्री संत गजानन महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने जीवनमोती सोसायटीतील गजानन महाराजांच्या मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रम घेण्यात आले. सायंकाळी ६ वाजता महिला मंडळाचा गीतगायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात महिला मंडळाच्या भजनी मंडळाने विविध भजने गायली. भजनांतूून संत गजानज महारांचा महिमा विषद करण्यात आला. रात्री ८ वाजता मनोज महाराज पिंप्राळेकर यांचा प्रवचनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...