आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात कोरोनानंतर आता अंगावर ‘फंगल इन्फेक्शन’ अर्थात गजकर्ण होण्याच्या रुग्णांमध्ये चारपटीने वाढ झाली आहे. त्वचा आजार असणाऱ्या रुग्णांपैकी ७० टक्के रुग्णांना खाज येण्याचा त्रास सुरू झाला आहे. दूषित पाण्यामुळेही या त्वचाविकारात वाढ होत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास इतरांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मास्कमुळे फेस फंगसच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचा दावा केला जातो आहे.
सध्या सगळ्यात जास्त त्वचेचा संसर्गजन्य आजार म्हणजे गजकर्ण आहे. ही एक प्रकारची बुरशी असून, हा काही प्रमाणात संसर्गजन्य आजार आहे. शरीराची योग्य काळजी घेतल्यास हा आजार कायमचा जाऊ शकतो. हा आजार संसर्गजन्य आहे. जळगाव जिल्ह्यात उष्णता अधिक असल्याने घाम येऊन त्वचेच्या ज्या भागाला हवा लागत नाही अशा भागात आर्द्रता जमा होते.
त्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्यास सुरुवात होते. हळूहळू ते इतर भागात पसरायला सुरुवात होते. मुख्यत: रात्रीच्या वेळेस खाज खूप जास्त येते. जेवढी जास्त खाज तेवढे जास्त इन्फेक्शन असते. याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. घरच्या घरी उपचार करण्याचे टाळणे योग्य ठरेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.