आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमध्ये 'ती' असुरक्षित:वेगवेगळ्या दोन घटनेत महिलांवर अत्याचार, संशयितावर गुन्हा दाखल

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांवर अत्याचार केल्याच्या दोन घटना घडल्या. या प्रकरणात बुधवारी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पारोळा तालुक्यातील एका गावातील महिलेवर घरात झोपलेली असतांना एकाने मुलांना जीवे मारण्याची धमकी तसेच परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सुरेश भिकन पवार यााच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पवार याने 10 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास मुलांसह घरात झोपलेली होती. रात्री 11 वाजेच्या सुमारास पवार याने घरात येऊन तोंड दाबून तुझ्यासह मुलांनाही मारून टाकेल, अशी धमकी देत अत्याचार केला. यानंतर पीडितेने ही घटना चुलत दिराला सांगत दोघे जण सुरेशच्या घरी जाब विचारायला गेलेत. याठिकाणी त्याच्या वडील भिकन हरचंद पवार याने त्यांच्या विरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला मारहाण करुन शिवीगाळ व धमकी दिल्याबाबत खोटी तक्रार दिली. परंतू यानंतर नातेवाईकांनी हिंमत दिल्यानंतर पीडितेने सुरेशविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड हे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत 65 वर्षीय निवृत्त शिक्षिकेस जातीवाचक शिवीगाळ, विनयभंग करत केली मारहाण केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तम शिवराम शिरवानी असे संशयिताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 6 डिसेंबर रोजी पिडीत वृद्ध महिलेने उत्तम शिरवानी याच्याकडे घराची चावी मागितली. या कारणावरून त्याने पीडित महिलेला लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच पीडितेने विरोध केला असता हात धरून तिच्या मनास लज्जा उत्त्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...