आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:तरुणीशी गैरवर्तन, महावितरण कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा ; राजेंद्र आमोदकर असे संशयित लिपिकाचे नाव

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरण कार्यालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचारी तरुणीशी व्यवस्थापक व लिपिकाने गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुरुवारी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उद्धव कडवे असे व्यवस्थापकाचे तर राजेंद्र आमोदकर असे संशयित लिपिकाचे नाव आहे. तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, सन २०१७ ते २०२१ या काळात कडवे हे नेहमीच त्रास देत होते. सर्व कर्मचारी घरी गेल्यानंतरही उशिरापर्यंत कार्यालयात थांबवून ठेवत होते. व्हॉट‌्सअॅपवर चॅटिंग करण्याची मागणी केली. घरी सोडून देतो, घेण्यासाठी येतो असे सांगून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यांचे म्हणने ऐकून न घेतल्याने तीन वेळा कामावरून कमी केले. नंतर पुन्हा कामावर घेऊन त्रास देणे सुरूच ठेवले. दरम्यान, २०२१मध्ये पीडित तरुणीने काम सोडले. यानंतर ११ मे रोजी आमोदकर याने तरुणीला फोन करून जावक रजिस्टरमध्ये नोंदी घ्यायचे काम शिल्लक असल्याने तुला कडवे साहेबांनी बोलावल्याचा निरोप दिला. त्यानुसार तरुणी १२ मे रोजी कार्यालयात गेली. या वेळी कडवे यांनी मागे झालेल्या प्रकाराची माफी मागितली, टेक्निकल साइटचे लोक माझ्या विरुद्ध कट रचत आहेत, तू त्यांना सपोर्ट करते आहेस असे मला कळले आहे अशी विचारणा केली. तरुणीने त्यावर नकारात्मक उत्तर दिले. तुला पुन्हा कामावर घेण्यासाठी प्रयत्न करतो असे कडवेंनी सांगितले. काम संपल्यानंतर आमोदकर दुचाकीने घरी सोडून देईल, असे सांगितले; परंतु तरुणीने नकार दिला. तरी आमोदकर याने कार्यालयाच्या परिसरात तरुणीला भेटून कडवे साहेब चांगले आहेत, तुझे काम करून देतील असे सांगत असतानाच त्याने तरुणीचा विनयभंग केला. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक नीलेश गोसावी तपास करीत आहेत. दरम्यान, घडलेल्या प्रकाराची तक्रार तरुणीने महावितरणच्या विशाखा समितीकडे केली आहे; परंतु, समितीने त्यावर काहीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

बातम्या आणखी आहेत...