आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल्पवयीन मुलीस पळवून नेत तीच्यावर तीन महिने अत्याचार केले. या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून २० वर्षे सश्रम कारावास व ४३ हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी ठोठावली.
घटन अशी की, भडगाव तालुक्यातील लखन उर्फ विजय रमेश गायकवाड (२८) याने २५ मे २०१८ रोजी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. यानंतर तीन महिने तिच्यावर अत्याचार केला. हे कृत्य करण्यासाठी त्याला अतुल उर्फ योगेश राजू गायकवाड याने सहकार्य केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक आनंद पटारे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप सादर केले होते. विषेश पोक्सो न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. या वेळी सरकारपक्षाने एकूण ११ साक्षीदार तपासले. यात पीडित मुलगी व तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने मुख्य आरोपी लखन याला शिक्षा ठोठावली. तर अतुल याला पुराव्याअभावी निर्दाेष मुक्त केले. सरकार पक्षातर्फे अॅड. चारुलता बोरसे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.