आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुल्कवाढ:अभाविपचा आक्रोश ; विद्यापीठ परिसर निदर्शने, घाेषणांनी दणाणून साेडला

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने मोठ्या प्रमाणात शुल्कवाढ केली आहे. या विरोधात सोमवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आक्रोश करण्यात आला. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी निदर्शने, घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

विद्यापीठाने शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश, परीक्षा शुल्कात मोठी वाढ केली आहे. या संदर्भात ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर सर्वच विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शवून कुलगुरू प्रा. डॉ. व्ही.एल. माहेश्वरी यांना शुल्कवाढ मागे घेण्यासाठी निवेदन दिले होते. या विरोधात भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सामेवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन विद्यापीठाच्या प्रशासनाला दिले आहे. प्रांतमंत्री अंकिता पवार यांनी विद्यार्थ्यांना फी वाढीच्या संदर्भात माहिती दिली. विभाग संयोजक कल्पेश सोनवणे, अश्विन सुरवाडे, मयूर माळी, चंद्रकला गावित, राजेंद्र पावरा, रितेश महाजन व पदाधिकारी उपस्थित होते.

व्हीसींनी दिले होते आश्वासन
शुल्कवाढीच्या ‘दिव्य मराठी’च्या वृत्तानंतर विद्यार्थी संघटनांनी कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांना निवेदन दिले. त्यावेळी विद्यापीठात नॅक पीअर टीम आलेली असल्यामुळे २८ ऑगस्ट रोजी संघटनांशी चर्चा करून शुल्क वाढ कमी करण्याचे आश्वासन डॉ. माहेश्वरी यांनी दिले होते.

बातम्या आणखी आहेत...