आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी अपघातात सोयगावच्या तरुणाचा मृत्यू:तीन दिवस रुग्णालयांमध्ये केले उपचार; आज सकाळी मालवली प्राणज्योत

जळगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकीवरुन पडल्याने डोक्याला मार लागलेल्या तरुणाचा सोमवारी सकाळी 6.30 वाजता मृत्यू झाला. या तरुणाने 12 तास मृत्यूशी झुंझ दिली. रविवारी सायंकाळी सहा वाजता सोयगाव (जि. औरंगाबाद) येथे तरुणाचा अपघात झाला होता. फरीद जमाल तडवी (वय 37, रा. बहुलखेडा, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे.

हातमजुरी करून फरीद कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. रविवारी सायंकाळी कामाच्या निमित्ताने तो दुचाकीने सोयगावजवळ आला होता. यावेळी एका पुलावरुन जाताना त्याची दुचाकी घसरली. पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली नाही. नागरिकांनी त्याला सुरूवातीला साेयगाव येथील रुग्णालयात दाखल केले. दुखापत जास्त असल्यामुळे डॉक्टरांनी जळगावात हलवण्याचा सल्ला दिला. यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मध्यरात्री तीन वाजता प्रकृती बिघडल्यामुळे त्याला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी 6.30 वाजता त्याची प्राणज्योत मालावली. वेगवेगळ्या तीन रुग्णालयांमध्ये उपचार करून देखील फरीदचा मृत्यू झाला. अतिरक्तस्त्राव व रक्तदाब वाढल्यामुळे त्याची प्रकृती खालावली होती. त्याने 12 तास मृत्यूशी झुंझ दिली. सोमवारी सकाळी 11 वाजता शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी सोयगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...