आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारावीचा हिंदीचा शेवटचा पेपर देऊन दुचाकीने घरी परत येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मंगळवारी दुपारी ४ वाजता वाकोदजवळ महामार्गावर अपघात झाला. ट्रकने अचानक उजवीकडे वळण घेल्याने दुचाकीचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. त्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर दोघे जखमी झाले.
व्यंकटेश सुधाकर सपकाळे (वय २४, रा. भुरे मामलेदार प्लॉट, शिवाजीनगर) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत असलेले धीरज हिरालाल शिरसाठ (वय २३, रा. शिवाजीनगर) व करण सतीश भगत (वय २२, रा. सुरत) हे दोघे जखमी झाले. व्यंकटेश, धीरज व करण हे तिघे मंगळवारी सकाळी सात वाजता सिल्लोड येथील गोसेगाव येथे एका महाविद्यालयात दुचाकीने (एमएच १९ बीपी ७७९९) ट्रिपल सीट परीक्षेला गेले होते. तिघे बारावीत असून, त्यांचा हिंदीचा पेपर होता. पेपर संपल्यानंतर तिघे जळगावकडे येण्यासाठी निघाले. वाकोदपासून काही अंतर पुढे आल्यानंतर त्यांच्या पुढे चालत असलेल्या ट्रकने उजवीकडे वळण घेतले. यामुळे त्यांच्या दुचाकीस जाण्यासाठी जागाच मिळाली नाही. परिणामी ट्रकचा धक्का बसला. या अपघातात दुचाकी सुमारे २० ते ३५ मीटर अंतर फरफटत गेली. दुचाकी चालवत असलेला व्यंकटेश फरफटत गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच हायवे मृत्युंजय दूत विशाल जोशी यांनी दोन्ही जखमींना स्वत:च्या वाहनातून जिल्हा रुग्णालयात पाठवले. तर मृत व्यंकटेशचा मृतदेह पहूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला. खिशातील आधारकार्डवरून व्यंकटेशची ओळख पटली. यानंतर कुटुंबीयांना माहिती दिली.असलेल्या ट्रकने उजवीकडे वळण घेतले. यामुळे त्यांच्या दुचाकीस जाण्यासाठी जागाच मिळाली नाही. परिणामी ट्रकचा धक्का बसला. या अपघातात दुचाकी सुमारे २० ते ३५ मीटर अंतर फरफटत गेली. दुचाकी चालवत असलेला व्यंकटेश फरफटत गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच हायवे मृत्युंजय दूत विशाल जोशी यांनी दोन्ही जखमींना स्वत:च्या वाहनातून जिल्हा रुग्णालयात पाठवले. तर मृत व्यंकटेशचा मृतदेह पहूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला. खिशातील आधारकार्डवरून व्यंकटेशची ओळख पटली. यानंतर कुटुंबीयांना माहिती दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.