आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेटीस:काेर्टाच्या आदेशानुसार रस्ते खुले करण्यासाठी मनपा देणार नाेटीस

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील खान्देश मिलच्या आवारातील दाेन्ही रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाचे पालन करावे, अशी नाेटीस महापालिकेकडून राजमुद्राला दिली जाणार आहे. व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

खान्देश मिलच्या आवारात बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांनी व्यापारी संकुल उभारले आहे. या संकुलाला महापालिकेने परवानगी दिल्यानंतर साहित्या यांनी २ काेटी ७५ लाख ६६ हजार ९०३ रुपये फी स्वरूपात महापालिकेत भरणा केला आहे. त्यामुळे मनपाने ११० दुकानदारांना व्यवसाय सुरू करण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा अन्यथा फी परत करावी अशी मागणी साहित्या यांनी केली आहे. रस्त्यांच्या मुद्द्यावर दाेन महिन्यांपूर्वी महापालिकेने राजमुद्रा रिअल इस्टेट यांना नाेटीस बजावली हाेती. तसेच गेटचे अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले हाेते. त्या आदेशाच्या विराेधात राजमुद्राच्या वतीने आैरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात न्यायालयाने महापालिकेने अतिक्रमण कारवाई करू नये तसेच राजमुद्रा यांनी रस्ते बंद करू नये असे दाेघांनाही आदेश दिले आहेत

बातम्या आणखी आहेत...