आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आचार्य जयमल जन्मोत्सव:आचार्य जयमल यांच्या 315 व्या तीनदिवसीय जन्मोत्सवास प्रारंभ

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आचार्य जयमल यांच्या ३१५व्या तीनदिवसीय जन्मोत्सवास सुरुवात झाली. मंगळवारी स्वाध्याय भवन येथे सकाळी ६ वाजता आचार्य पार्श्वचंद्र यांच्या महामांगलिकने ‘पूज्य जयमलजाप’ आरंभ झाला. या वेळी दिवसभर चालणाऱ्या मंगलकारी जपासाठी शेकडो श्रावक-श्राविका सहभागी झाले होते.

कार्यक्रमास जय जाप समितीचे चेअरमन शांतिलाल चोपडा (चेन्नई), सुशील बाफना, स्वरूप लुंकड, ममता कांकरिया, अनिल कोठारी, अजय राखेचा व भाविक उपस्थित होते. दिवसभर चालणाऱ्या जपात सुशील बालिका मंडल, समता महिला मंडल, अरिहंत मार्गी महिला मंडल, जय आनंद ग्रुप, स्वाध्याय महिला मंडल, लुक अॅण्ड लर्न, जेपीपी महिला फाउंडेशन, सुशील बहू मंडल, सम्यक महिला मंडल, जितो लेडीज विंग या संस्थेच्या सदस्यांनी हिरिरीने सहभाग घेतला. जाप सुरू असताना दलीचंद जैन यांनी सदिच्छा भेट दिली. सायंकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजी राजे सभागृहात जळगावच्या महिला मंडळाचा संस्कृतिक कार्यक्रम सादर झाला.

यावेळी विशेष कार्य करणाऱ्या, गुणवंत सदस्यांचा गौरव जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. बुधवारी दुपारी अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी जयमल जैन श्रावक संघाची कार्यकारी सभा, जे. पी. पी. जैन महिला फाउंडेशनचे राष्ट्रीय अधिवेशन जैन हिल्स येथे होणार आहे. सायंकाळी ७ वाजता छत्रपती संभाजी राजे सभागृह महाबळ रोड येथे सांस्कृतिक कार्यक्रम हाेणार आहे. गुरुवारी जैन हिल्स येथे डॉ. पदमचंद्र यांचे सकाळी ९ ते १० ओजस्वी प्रवचन, मंगलाचरण, स्वागत गीत, अतिथी स्वागत, प्रस्तावना व गुरुभक्ती होईल. सकाळी १० ते ११ दरम्यान बहुमान, प्रासंगिक कार्यक्रम, सामूहिक तेले तप प्रत्याख्यान होईल. दुपारी पावणेबारा वाजेपासून आकाश ग्राउंड, जैन हिल्स येथे गौतम प्रसादी होईल. त्यापूर्वी पार्श्वचंद्र महाराज यांच्याद्वारा महाप्रभावी महामांगलिक दिली जाणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे संघपती दलीचंद जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगाव पदाधिकाऱ्यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...