आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टँकर:पिण्याच्या पाण्यासाठी 52 विहीरी अधिग्रहीत; जिल्ह्यात आठ टँकर सुरु

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली नाही. या मुळे जिल्ह्यातील आठ गावांमध्ये अजुनही टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. तसेच ५२ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्यात सर्वाधिक जामनेर तालुक्यात १३ विहिरी अधिग्रहीत आहेत. उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत कमी झाल्याने पाणीपुरवठा विभागातर्फे टंचाईग्रस्त गावांत पिण्याच्या पाण्यासाठी विहीरी अधिग्रहीत केल्या जात आहेत. यात चाळीसगाव ३, जामनेर १३, भडगाव ४, मुक्ताईनगर ११, पारोळा ६, बोदवड २, एरंडोल २, भुसावळ २, पाचोरा २, धरणगाव २, चोपडा २. अमळनेर १ यांचा समावेश आहे. तर हातगाव (ता. चाळीसगाव), पिंपळगाव, वाघळी, कंडारी, भडगावातील वसंतवाडी, तळवणतांडा, पारोळा तालुक्यात हनुमंतखेडे, खेडीढोक या गावांमध्ये आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंती जी. एस. भोगावडे यांनी दिली.

जलजीवन मिशनअंतर्गत ६४२ कामांचे डीपीआर तयार जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या कामांचा बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आढावा घेतला. त्यात ७४९ कामांपैकी मे महिन्याअखेर ६४२ कामांचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार झाला आहे. या कामांना तांत्रिक मान्यता घेण्याच्या सुचनाही देण्यात आल्या. उर्वरित कामांसाठी पंधरा दिवसाचा अ‌वधी देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...