आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोठमोठ्या व्यावसायिक इमारती भर रस्त्यावर उभारताना इमारतीच्या तळघरात पार्किंगची व्यवस्था कागदावर दाखावायची आणि परवानगी मिळाल्यावर मात्र, त्या जागेचा व्यावसायिक वापर करायचा, असे प्रकार आजही शहरात बिनदिक्कतपणे सुरू आहेत. महात्मा गांधी मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी २०१९-२० मध्ये बांधलेल्या कोपऱ्याच्या इमारतीच्या बाबतीतही हा प्रकार झाला असून, पार्किंगच्या जागेचा गोदाम आणि इतर कामांसाठी वापर करण्यात येतो आहे.
नेहरू चौक ते लालबहादूर शास्त्रीटॉवर या शहरातील भर बाजारपेठचा भाग असलेल्या मार्गावर नीलेश मनोहरलाल नाथानी यांनी (घर क्रमांक १६८) ही इमारत बांधली आहे. त्यासाठीचा भूखंड १५६.१ चौरस मीटर असून, इमारतीत तळघर,तळमजला, पहिला आणि दुसरा मजला असे चार मजले आहेत. ही इमारत उभारण्यासाठी त्यांनी ३० जानेवारी २०१९ ला महापालिकेकडे बांधकाम परवानगीसाठी नकाशासह अर्ज केला. या प्लाटला तीन बाजूला रस्ते आहे. समोरटॉवर रोड असून इमारतीच्या डाव्या बाजूचा रस्ता गोलाणी मार्केटच्या दिशेने जातो.
मागच्या बाजूला गल्ली वजा लहान रस्ता आहे. पालिकेच्या नगररचना विभागाकडे परवानगीसाठी केलेल्या अर्जासोबतच्या नकाशात तळघरात ७.१३ बाय ७.३५ मीटर जागेत पार्किंगची व्यवस्था दाखवण्यात आली होती. यासाठी इमारतीच्या मागील बाजूने प्रवेशद्वार आणि रॅम्प दाखवण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर इमारतीचे बांधकाम झाले.त्यात प्लाननुसार पार्किंगची सुविधाही केली. पालिकेच्या नगर रचना विभागाने त्याची पडताळणी करून पाच फेब्रुवारी २०२१ ला मिळकतदाराला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला गेला. हा दाखला मिळाल्यानंतर जिथे पार्किंगची व्यवस्था दाखवण्यात आली होती त्या जागेकडे जाण्याचा मार्ग भिंत बांधून बंद करण्यात आला आणि त्यानंतर तिथे गोदाम आणि कपडे फिटींगचे काम सुरू केले आ
म्हणे सुरक्षेसाठी बंद केले पार्किंग : पार्किंगच्या जागेचा व्यावसायिक वापर सुरू केल्याबद्दल तक्रार आल्यानंतर महापालिकेने नाथाणी यांना नोटीस बजावली. त्यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने पार्किंगच्या जागेचा दरवाजा बंद केला असल्याचे त्यांनी महापालिकेला लिहून दिले आहे. त्यावर महापालिकेने काय निर्णय घेतला हे मात्र समजू शकले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.